Dr Babasaheb Ambedkar started the hostel admission process for backwards-class children
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
खेड तालुक्यात चांडोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
पुणे : खेड तालुक्यात चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
इयता ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित टक्केवारीप्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
वसतिगृहाची प्रवेश क्षमता कमाल १०० आहे. विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरुण- पांघरुण व दरमहा ५०० रूपये निर्वाह भत्ता दिला जातो. वसतिगृहामध्ये स्वतंत्र संगणक कक्ष, अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा आहे.
विद्यार्थ्यांनी अर्जासाठी व अधिक माहितीसाठी वसतिगृहात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com