IIMC admissions 2022 begin, applications via CUET before June 18
भारतीय जनसंचार संस्था (IIMC) 2022 साठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश सुरू, 18 जून प्रवेशाची अंतिम मुदत
माध्यम शिक्षणासाठी आयआयएमसीला सर्वाधिक पसंती
नवी दिल्ली : भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसी) ने जनसंवाद आणि पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका ( The post-graduate diploma courses of mass communication and journalism)अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यावर्षापासून, आयआयएमसीसाठी प्रवेश केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेमार्फत (सीयूईटी) दिले जातील.
ही प्रवेश परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए)(National Testing Agency) घेईल. इच्छुक उमेदवार आपले अर्ज https: cuet.nta.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करू शकतात. आयआयएमसी 2022 साठी प्रवेशाकरिता नाव नोंदणीची अंतिम तारीख 18 जून 2022 ही आहे.
इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि दूरदर्शन पत्रकारिता तसेच डिजिटल मीडिया पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीयूईटी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह आयआयएमसीमध्ये एनटीए प्रवेश परीक्षा घेईल.
विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशांसाठी त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात येईल. आयआयएमसीच्या छापील माहितीपत्रकात याचा विस्तृत तपशील लवकरच देण्यात येईल.
ओडिसी, मराठी, मल्याळम आणि उर्दू पत्रकारिता या भाषांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा मात्र स्वतंत्रपणे घेण्यात येतील आणि आयआयएमसीचे संकेतस्थळ www.iimc.gov.in वर प्रवेश अर्ज लवकरच जारी करण्यात येतील.
प्रवेश प्रक्रियेचे प्रभारी प्राध्यापक गोविंद सिंग यांनी सांगितले की, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येईल. जे विद्यार्थी पदवीच्या अखेरच्या वर्षाची किंवा सेमिस्टरची परीक्षा देत आहेत किंवा दिली आहे, तेही अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांची जर निवड झाली तर त्यांचा प्रवेश त्यांनी सादर केलेले तात्पुरते गुणपत्रक किंवा महाविद्यालय/विद्यापीठाकडून मिळालेले मूळ प्रमाणपत्र जास्तीत जास्त 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करण्यावर अवलंबून असेल. (अगदीच अपवादात्मक प्रकरणांमध्ये योग्य कारणे निश्चित केल्यावर ही मुदत वाढवता येईल). अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, आयआयएमसी कार्यालयात पडताळणीसाठी मूळ पदवी प्रमाणपत्र सादर केल्यावरच पदविका प्रदान केली जाईल.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी, अर्जदार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचा शैक्षणिक विभाग, अरूणा असफ अली मार्ग, नवी दिल्ली 110067 येथे संपर्क साधू शकतात. टेलि क्रमांक 011-26742920 (विस्तारित क्रमांक 233). मोबाईल क्रमांक- 9818005590 (व्हॉट्सअपवर संदेश पाठवण्यासाठी 9871182276).
हडपसर न्युज ब्युरो