मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कंत्राटांची विशेष कॅगमार्फत चौकशी होणार

Bombay-Mumbai-High-Court

12 thousand crore contracts of Mumbai Municipal Corporation will be investigated through special CAG

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कंत्राटांची विशेष कॅगमार्फत चौकशी होणार

मुंबई : मुंबई महालिकेतील १२ हजार कोटींच्या कंत्राटांची विशेष कॅगमार्फत चौकशी होणार आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलतांना दिली आहे. ते आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.BJP leader Ashish Shelar भाजपा नेते आशिष शेलार हडपसर मराठी बातम्या

“माजले होते बोके, कोरोना काळात खाऊन खोके त्यांची कॅगमार्फत चौकशी म्हणजे एकदम ओक्के” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे दिली

या चौकशीमुळे शिवसेना ठाकरे गट अडचणीत येऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. कॅग चौकशीमुळे शिंदे-फडणवीस विरुद्ध ठाकरे असा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे म्हटले जात आहे.

चार पुलांची बांधकामे याच काळात झाली. पूल चार आणि खर्च १ हजार ४९६ कोटी रुपये. अमर्याद खर्च करण्यात आला. कोरोना काळात रुग्णालयात आवश्यकता दाखवून खरेदी झाली ती ९०४ कोटीची… या ३५३८ कोटी मध्यवर्ती खरेदी, ९०४ कोटी रुग्णालयातील खरेदी म्हणजे चार साडेचार कोटी रुपयांची खरेदी.. कंत्राटदार कंपन्या बोगस, एकच कंत्राटदार, जवळच्या नातेवाईकांना कंत्राट यातून मलिदा कमवायचा कार्यक्रम चालू होता.

मुंबई महापालिकेत दुरव्यहार, दुराचार आणि भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही सातत्याने सांगत होतो. आता मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश निर्गमित केल्याची माहिती आहे. २८ नोव्हेंबर २०१९ पासून २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दहा वेगवेगळ्या विभागात जवळजवळ १२ हजार १३ कोटी रुपयांची जी कंत्राटी दिली गेली. त्या संबंधित ही चौकशी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मुस्लिम हा छुपा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खेळला जातो आहे. उद्धवजी यांना मराठी मुस्लिम अजेंडा चालतो पण मराठी जैन, मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि तर मराठी हिंदू हा अजेंडा चालत नाही याचं कारण काय आहे?जागर मुंबईचा यातून या बाबतचं सत्य मुंबईकरांसमोर आणणार असल्याचंही ते म्हणाले.

याविरोधात जनजागृती करण्यासाठी जागर मुंबईचा हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्यावर दिली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *