Labor Department appeals to shops and establishments to implement ‘Har Ghar Tiranga’ initiative
दुकाने व आस्थापनांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवण्याचे कामगार विभागाचे आवाहन
पुणे : हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा ) हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये दुकाने व आस्थापनांनी राबवावा. यासाठी राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी आस्थापनांना कामगार विभागाने प्रेरीत करावे असे निर्देश कामगार विभागाचे प्रधान सचिव यांनी दिले आहेत.
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’(घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबवायचा आहे. कामगार विभागांतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या निवासस्थानी या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियम व सेवाशर्ती अधिनियम 2017 नुसार नोंदणीकृत सर्व आस्थापनांना राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी प्रेरीत करावे.
उपक्रम राबवताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे व राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी जाणीवजागृती करावी, असेही शासन परिपत्रकानुसार कळवण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा कामगार उपायुक्तांनी दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com