शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत ग्रामीण आणि आदिवासी प्रश्न समजून घ्यावेत

National Education Policy 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Rural and tribal issues should be understood in the implementation of education policy

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत ग्रामीण आणि आदिवासी प्रश्न समजून घ्यावेत

– डॉ.भारत काळे

विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयक दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आपण भविष्यातील पिढीला कोणत्या प्रकारचे शिक्षक हवेत याचा आत्ताच अभ्यास करणे आवश्यक

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमबजावणी करत असताना शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रश्न समजून घेणे आवश्यकNational Education Policy 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News असून त्यानुसार धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असे मत सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ( सी-मेट) चे महासंचालक डॉ. भारत काळे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० – प्रभावी अंमलबजावणी आणि पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक तयार करणे ‘ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाळा आणि शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग यांनी ‘कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फाऊंडेशन (सीटीईएफ) आणि ‘मॅप इपिक कम्युनिकशन प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आपण भविष्यातील पिढीला कोणत्या प्रकारचे शिक्षक हवेत याचा आत्ताच अभ्यास करणे आवश्यक आहे. शिक्षणातील ५.० या क्रांतीसाठी आपण सज्ज व्हायला हवे.

– डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

या परिषदेला विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. चंद्रकांत रगीट, सीटीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष केशव भांडारकर, आंतरराष्ट्रीय सचिव डॉ.नीलिमा भागबती, मॅप एपिकचे संचालक मंदार नामजोशी, जोहाना लॅम्पिनेन, ऑड्रे पॅराडिस, दक्षिण पूर्व नॉर्वे विद्यापीठाचे अस्मंड आमास, डॉ.वैभव जाधव, डॉ.गीता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेसाठी फिनलंड आणि नॉर्वे येथून जवळपास ३० परदेशी अभ्यासक उपस्थित होते.

यावेळी डॉ.काळे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना प्रत्येक भागातील परिस्थिती समजावून घेत यावर काम झाले तर आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकू असेही डॉ.काळे म्हणाले.

यावेळी डॉ.चंद्रकांत रगीट यांनी मातृभाषेतील शिक्षणावर भर द्यावा असे सांगितले. तर यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *