नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने आणखी एक पाऊल..!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Another step towards implementation of new education policy..!!

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने आणखी एक पाऊल..!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील बीएमसीसी, न्युयॉर्क यांच्या ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’ वर स्वाक्षऱ्या

पुणे : विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये तसेच स्वायत्त महाविद्यालये यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी परदेशी विद्यापीठे व महाविद्यालयांशी जोडण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ‘ बुरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी), ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी विद्यापीठात ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’ वर स्वाक्षऱ्या केल्या.Savitribai Phule Pune University

यावेळी डॉ.बाबसाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हे विद्यापीठ आणि बीएमसीसी यांनीही ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’ वर स्वाक्षऱ्या केल्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हे स्टेटमेंट असून विद्यार्थ्यांना दर्जेदार आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याचा मानस यात आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व डॉ.बाबसाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान जोगी, बीएमसीसीचे अध्यक्ष डॉ.अँटनी मुनरो, उपाध्यक्ष डॉ. संजय रामनाथ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर, इनोवेशन सेलचे संचालक डॉ.संजय ढोले, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ३० स्वायत्त महाविद्यालयांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

भविष्यात या कम्युनिटी कॉलेजसोबत करार करत नवे अभ्यासक्रम सुरू करणे, एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेणे, प्राध्यापक विद्यार्थी आदानप्रदान करणे, एकत्रित कार्यशाळा, चर्चासत्रे घेणे, आदी गोष्टी या ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’मुळे करणे शक्य होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमबजावणी विद्यापीठाने सुरू केली आहे. विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत व अमेरिकेचे शैक्षणिक सांस्कृतिक सबंध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे समन्वयक व तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर यांनी नुकत्याच अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी देत याची सुरुवात केली होती. यामध्ये वेगवेगळ्या परदेशी संस्थांसोबत पाच सामंजस्य करारही करण्यात आले होते. हे ‘स्टेटमेंट ऑफ शेअर्ड इंटरेस्ट’ या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *