लाचखोरीच्या प्रकरणात तत्कालीन प्राप्तिकर अधिकाऱ्याला तीन वर्षे सश्रम कारावास

Central Bureau of Investigation (CBI) केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The then income tax officer was sentenced to three years of rigorous imprisonment in the bribery case

लाचखोरीच्या प्रकरणात तत्कालीन प्राप्तिकर अधिकाऱ्याला तीन वर्षे सश्रम कारावास

मुंबई/पुणे : विशेष न्यायाधीश, सीबीआय प्रकरणे, पुणे (महाराष्ट्र) यांनी शेखर खोमणे, तत्कालीन प्राप्तिकर अधिकारी, प्रभाग 12(4), परिक्षेत्र 12, पुणे यांना लाच घेतल्याप्रकरणी तीन वर्षांच्या सक्तमजुरीसह रु. 50,000/- दंडाची शिक्षा सुनावली आहे. Central Bureau of Investigation (CBI) केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सीबीआयने 04.12.2018 रोजी शेखर मधुकर खोमणे, प्राप्तिकर अधिकारी, वॉर्ड 12(4), आयकर भवन, बोधी टॉवर, सॅलिसबेरी पार्क, गुलटेकडी, पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

आरोपीने तक्रारदाराकडून त्याच्या विरुद्धची प्राप्तिकर कार्यवाही निकाली काढण्यासाठी 1,00,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.

सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी करताना आणि स्वीकारताना रंगेहात पकडले. आरोपीच्या घरात झडती घेऊन मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

तपासानंतर, 12.03.2019 रोजी विशेष न्यायाधीश, सीबीआय प्रकरणे, पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून सजा सुनावली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *