Imran Khan guilty in Toshakhana corruption case
इम्रान खान तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी
अमेरिकन दूतावासाने पाकिस्तानमधल्या नागरिकांसाठी प्रवास सुचना जाहीर केल्या
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या न्यायालयाने माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात आज दोषी ठरवलं. काल त्यांना निमलष्करी रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून एक दिवस आधी अटक केली होती.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, पीएमएल-एन, अर्थात पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझच्या युती सरकारने तोशाखानाला दिलेल्या भेटवस्तू आणि काहींच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेल्या रकमेची माहिती त्यांनी उघड केली नाही, असा दावा करत खान यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.
भेटवस्तू अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोकडे 8 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.पाकिस्तानमधल्या क्वेटा, कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरसह अनेक शहरांमध्ये खान यांच्या अटकेविरोधात तीव्र हिंसक निदर्शने झाली आहेत.
क्वेट्टा इथं पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ, पीटीआय निदर्शक आणि लष्कर यांच्यात झालेल्या संघर्षात किमान दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. अशाच प्रकारच्या हिंसाचारात कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोर आणि इस्लामाबादमध्ये सुमारे १५ जण जखमी झाले.
इम्रान खानच्या समर्थकांनी इस्लामाबादमधल्या प्रधानमंत्री शेहबाज शरीफ यांचं, तसंच लाहोरमधल्या सर्वोच्च प्रादेशिक कमांडर यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि जाळले. आंदोलकांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाचे मुख्य गेटही फोडले. पाकिस्तानमधल्या राजकीय अशांततेचम कारण देत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी आणि दुतावासातल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रवासी सूचना जारी केल्या आहेत.
अमेरिकन दूतावासाने पाकिस्तानमधल्या नागरिकांसाठी प्रवास सुचना जाहीर केल्या आहेत. अशा सुरक्षा परिस्थितीमुळे कॅनडाच्या सरकारने आपल्या नागरिकांना आणि दुतावासातल्या कर्मचार्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com