आकाशवाणीच्या ९१ FM ट्रान्समीटर्स लोकार्पण

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Inauguration of 91 FM transmitters of AIR

आकाशवाणीच्या ९१ FM ट्रान्समीटर्स लोकार्पण

या सर्व ट्रान्समीटर्समुळे देशातल्या ३५ हजार किलोमीटर क्षेत्रातल्या दोन कोटी लोकसंख्येपर्यंत एफएम सेवा पोहोचणार

राज्यातल्या नंदूरबार, हिंगोली, वाशिम, सटाणा, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या ७ ठिकाणच्या ट्रान्समीटर्सचं उद्घाटन

नवी दिल्ली : देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीच्या ९१ FM ट्रान्समीटर्स लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.All India Radio launches #AIRNxt

देशातली १८ राज्य आणि २ केंद्र शासित प्रदेशातल्या ८४ जिल्ह्यांमध्ये हे ट्रान्समीटर उभारण्यात आले आहेत. राज्यातल्या नंदूरबार, हिंगोली, वाशिम, सटाणा, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या ७ ठिकाणच्या ट्रान्समीटर्सचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज केलं.

सुस्पष्ट ध्वनी गुणवत्ता आणि एफएम सुविधेने सुसज्ज मोबाईल फोनची सहज उपलब्धता यामुळे देशात एफएम रेडिओ सेवेची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आणि संस्थेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल म्हणून सरकारने देशात आणखी 63 एफएम ट्रान्समीटर्स बसवण्यास मंजुरी दिली आहे.

तंत्रज्ञानानं केलेल्या प्रगतीमुळं रेडिओ नवीन अवतारात लोकांपर्यंत पोहोचला आहे. डिजिटल इंडियानं ऑनलाइन एफ एम आणि पॉडकास्टच्या माध्यमातून रेडिओला नवी श्रोता दिल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. यामुळं शेतीसाठी हवामानाची माहिती, महिला बचत गटांना नव्या बाजारपेठांपर्यंत जोडणं वगैरे गोष्टींसाठी सर्वसामान्य नागरिकांना या एफ एम चा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं.

या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी आकाशवाणीचे अभिनंदन केले. या जोडणीच्या महत्त्वाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या विस्तारात आजचा दिवस अखिल भारतीय एफएम बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आकाशवाणीद्वारे 91 एफएम ट्रान्समीटर्सची सुरुवात ते जिल्हे आणि देशातील 2 कोटी लोकांसाठी जणू भेटवस्तू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मन की बातचा शंभरावा भाग येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांशी संवाद साधायचा तर रेडिओला पर्याय नसल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

या सर्व ट्रान्समीटर्समुळे देशातल्या ३५ हजार किलोमीटर क्षेत्रातल्या दोन कोटी लोकसंख्येपर्यंत एफएम सेवा पोहोचणार आहे. नव्या एफएम ट्रान्समीटर्समुळं मनोरंजन, क्रीडा, कृषीविषयक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार देशातल्या विविध ठिकाणांहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नव्या एफ एम केंद्रांविषयी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरमध्ये सुरू झालेल्या केंद्राच्या उद्घाटनाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते. या केंद्रामुळं मेळघाटासह आसपासच्या नागरिकांना आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतील, असं केंद्र प्रमुख सुनील कोठाळे यांनी सांगितलं.

नंदूरबारमध्ये १०० वॅट क्षमतेच्या एफएम ट्रान्समीटरच्या उद्घाटनाला आदिवासी विकासमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉ हिना गावित उपस्थित होत्या. नंदुरबार शहरातल्या खोडाई माता रस्त्यावरील पूर्वीच्या दूरदर्शन केंद्रात या आकाशवाणी प्रक्षेपण केंद्राची निर्मीती करण्यात आली आहे.

वाशिममध्ये झालेल्या कार्यक्रमात खासदार भावना गवळी यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते. वाशीममधल्या लघु प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात हा ट्रान्समीटर उभारण्यात आला आहे.

गडचिरोलीत अहेरी इथं झालेल्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते प्रत्यक्ष उपस्थित होते. सिरोंचा इथल्या कार्यक्रमाला त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या दुर्गम तालुक्यात एफ एम केंद्र सुरू झाल्यानं नागरिकांनी सरकारच्या विविध योजनांसह, हवामान, शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती मिळेल.

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथल्या ट्रान्समीटरच्या उद्घाटनाला आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते. परिसरातल्या ३० किलोमीटर क्षेत्रातल्या गावांना आणि पाड्यांना आता एफ एम वरचे कार्यक्रम ऐकता येतील

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *