Inauguration of Amazon’s vegetable collection center by marketing director
पणन संचालकांच्या हस्ते ॲमेझॉनच्या भाजीपाला संकलन केंद्राचे उदघाट्न
पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे राज्यातील पाचव्या अँमेझॉन फळ व भाजीपाला संकलन केंद्राचे राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार यांच्या उद्घाटन हस्ते झाले.
यावेळी पणन सह-संचालक विनायक कोकरे, अँमेझॉनचे प्रमुख राजेश प्रसाद, डॉ. शशीन शोभणे आणि शेतकरी उपस्थित होते.
पणन संचालक श्री. पवार म्हणाले, शेतकऱ्याना भाजीपाला, पालेभाज्या व इतर फळांचे संकलन आणि वितरणाच्यादृष्टीने अँमेझॉन संकलन केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे. या संकलन केंद्रांमुळे दलालीला आळा बसून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कंपन्या आज उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाच्या बाबतीत फायदा होईल, अशी आशा श्री. पवार यांनी व्यक्त केली.
ग्राहक ते थेट बाजारपेठ व्यवस्था केवळ आपल्या राज्यात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने पणन मंडळाच्यावतीने कंत्राटीशेती आणि तत्सम पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असेही श्री.पवार यांनी सांगितले.
राजेश प्रसाद म्हणाले, ॲमेझॉनने महाराष्ट्रात पहिले संकलन केंद्र मंचर येथे सुरु केले. त्यानंतर नाशिक, वाई, रत्नागिरी आणि आता पुणे येथील हे पाचवे केंद्र आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला ॲमेझॉनच्यावतीने पाच तासांच्या आत देण्यात येतो. शेतकऱ्यांना पीक लागवड तसेच रोग व कीड नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते, असेही ते म्हणाले.
संकलन केंद्रामुळे स्थानिक भाजीपाला शेतकऱ्यांना ॲमेझॉन खरेदी प्लॅटफॉर्मवर आणले असून त्यांचा बाजारपेठेतील प्रवेश वाढणार असल्याचे, डॉ. शशीन म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com