Inauguration of Bhandarkar’s Amphitheater next Thursday
भांडारकर संस्थेच्या अॅम्फी थिएटरचे येत्या गुरुवारी उद्घाटन
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने श्री फिरोदीया ट्रस्टच्या सहकार्याने उभारलेल्या भव्य अॅम्फी थिएटरचे (समवसरण) उद्घाटन येत्या गुरुवारी (14 एप्रिल) सायं. 5 वाजता केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदीया आणि कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज येथे सांगितली.
या उद्घाटन समारंभाला पुण्याचे खासदार गिरीशजी बापट व संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
भांडारकर संस्थेच्या प्रांगणात सुमारे 80 वर्षे जुने असलेल्या वटवृक्षाभोवती हे खुले रंगमंच व प्रेक्षागृह श्री फिरोदीया ट्रस्टने संस्थेकरिता उभारुन दिले आहे.
सुमारे दीड हजार प्रेक्षक बसू शकतील इतकी आसऩक्षमता असलेल्या या भव्य अॅम्फी थिएटरचे समवसरण असे नामकरण करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.
Hadapsar News Bureau.