Inauguration of District Literature Festival on 15th November
जिल्हा ग्रंथोत्सवाचे १५ नोव्हेंबर रोजी उद्घाटन
पुणे : महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव- २०२२’चे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. उद्घाटन होणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोलेरोड, शिवाजीनगर येथे हा ग्रंथोत्सव होणार आहे.
या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात
- १५ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून ११.३० वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
- दुपारी ३ ते ४ वा. ‘सार्वजनिक ग्रंथालयांची उर्जित अवस्था’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
- दुपारी ४ ते ५ वा. जी.एं.च्या कथांचे अभिवाचन, दुपारी ५ ते सायं. ६ वा. एकपात्री काव्य नाट्यानुभव ‘कुटुंब रंगले काव्यात’चे सादरीकरण होणार आहे.
- दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांच्या दर्जेदार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा आणि ग्रंथखरेदी करुन वाचनचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे. श्री. गोखले यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com