Union Minister Nitin Gadkari inaugurated five national highway projects worth Rs 1261 crore in Madhya Pradesh.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशात 1261 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेश मध्ये मंडला येथे, 1261 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 329 किमी लांबीच्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते, राज्यमंत्री गोपाल भार्गव, बिसाहुलाल सिंह आणि खासदार, आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मंडला आणि कान्हा राष्ट्रीय अभयारण्य परिसरातील निसर्ग सौदर्य नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान ठरले आहे, आता या रस्ते प्रकल्पांच्या बांधकामामुळे या भागाला आणि येथील वनवासींना चांगल्या सोई सुविधा उपलब्ध होतील, या प्रकल्पामुळे मंडला, जबलपूर, दिंडोरी आणि बालाघाट जिल्ह्यांशी जोडले जाईल, असे गडकरी म्हणाले.
या मार्गांच्या निर्मितीमुळे पंचमढी, भेडाघाट आणि अमरकंटक यांसारखी धार्मिक स्थळे तसेच जबलपूरहून अमरकंटकमार्गे बिलासपूर, रायपूर आणि दुर्गकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय नजीकच्या प्रदेशातून होणारी कृषीमाल आणि औद्योगिक उत्पादनाची वाहतूक करणे सोपे झाल्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होईल. असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार मध्य प्रदेशची समृद्धी आणि विकास साध्य करण्याच्या दिशेने सातत्याने कार्य करत आहे, असे गडकरी म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com