Inauguration of Lata Mangeshkar Chowk in Ayodhya
अयोध्या येथे लता मंगेशकर चौकाचे उदघाट्न
अयोध्येतील लता मंगेशकर चौकातील लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले
नवी दिल्ली : लता मंगेशकर यांच्या ९३ व्या जयंती निमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज अयोध्या इथल्या ‘लता मंगेशकर चौकाचं’ उद्घाटन झालं. चौकाचं आधीचं नाव न्याय घाट होतं. याचौकात चाळीस फूट उंच आणि चौदा टन वजनाची, वीणा या वाद्याची प्रतिकृती बसवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अयोध्येतील लता मंगेशकर चौकाच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाच्या आदरणीय आणि प्रेमळ मूर्ती लता दीदींचा वाढदिवस साजरा केला.
त्यांनी नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस देखील साजरा केला, जेव्हा माँ चंद्रघंटाची पूजा केली जाते. पंतप्रधान म्हणाले की, साधक जेव्हा कठोर साधनेतून जातो तेव्हा त्याला माँ चंद्रघंटाच्या कृपेने दैवी वाणींचा अनुभव येतो. “लता जी माँ सरस्वतीच्या अशाच एक साधक होत्या, ज्यांनी आपल्या दैवी वाणीने संपूर्ण जगाला मोहित केले. लताजींनी साधना केली, आम्हा सर्वांना वरदान मिळाले!”, असे मनोगत पंतप्रधानांनी व्यक्त केले.
अयोध्येतील लता मंगेशकर चौकात स्थापित केलेली माँ सरस्वतीची विशाल वीणा, संगीताच्या अभ्यासाचे प्रतीक बनेल, असे मोदींनी अधोरेखित केले. चौक संकुलातील तलावाच्या वाहत्या पाण्यात संगमरवरी ९२ पांढरी कमळे लताजींच्या संपूर्ण आयुष्याचे प्रतिबिंब ठरतील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
लता मंगेशकर चौकाच्या विकासाचे ठिकाण अयोध्येतील विविध सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या प्रमुख स्थळांपैकी एक असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा चौक राम की पौडी जवळ आहे आणि शरयू नदीच्या पवित्र प्रवाहाजवळ आहे. “लता दीदींच्या नावावर चौक बांधण्यासाठी त्यापेक्षा आणखी कोणती चांगली जागा असू शकते?”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. अनेक युगांपासून अयोध्येने प्रभू रामाची जी साधना केली आहे, त्याच्याशी साधर्म्य साधून पंतप्रधान म्हणाले की, लता दीदींच्या भजनाने आपले अंत:करण प्रभू राम नामात गुंतून ठेवले आहे”
या अभिनव प्रयत्नाबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकार आणि अयोध्या विकास प्राधिकरणाचे अभिनंदन केले आणि सर्व देशवासियांच्या वतीने लताजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “मी प्रभू श्री रामाला प्रार्थना करतो की, त्यांच्या जीवनातून आम्हाला मिळालेले आशीर्वाद त्यांच्या मधुर गाण्यांद्वारे येणाऱ्या अनेक पिढ्यांवर छाप सोडत राहावेत”, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भारताच्या हजारो वर्षांच्या जुन्या वारशाचा अभिमान बाळगताना भारताची संस्कृती येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त केली. “लता दीदींचे गायन या देशातल्या प्रत्येक कणाला पुढील अनेक युगांशी जोडेल”, असेही ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com