हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

Hadapsar Info Medial Logo

Inauguration of Martyr Shivram Hari Rajguru Memorial by Chief Minister, Deputy Chief Minister

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले.overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, मातृभक्त शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे सदस्य सत्यशील राजगुरू, उमा संजीव महादेकर, स्मारक निर्मिती ग्रुपचे ॲड. प्रथमेश पाडेकर आदी उपस्थित होते.

हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन

हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर , महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मुंबई शहर चे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, महापालिका, पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *