सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘प्लेसमेंट सेल’ च्या इमारतीचे उद्घाटन

Inauguration of ‘Placement Cell’ building at Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘प्लेसमेंट सेल’ च्या इमारतीचे उद्घाटन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘प्लेसमेंट सेल अँड कॉर्पोरेशन सेल’ च्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्लेसमेंट सेलचे प्रमुख मार्गदर्शक संजीव मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेक उद्योगांची संशोधन आणि प्रयोगशाळेची केंद्र विद्यापीठात व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. रिसर्च पार्क फाउंडेशन, सिफोरआयफोर संस्था आणि हे प्लेसमेंट सेल हे सगळं एकमेकांशी संबंधित असल्याने हे एकच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणे नॉलेज क्लस्टरचं केंद्र आपल्याकडे आहे. या सगळ्यातून ‘हेतूसह शिक्षण ‘ ही संकल्पना साध्य करत उद्योग आणि शिक्षण यांचा समन्वय घडवून आणण्याचे काम आम्ही करत आहोत.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

यावेळी डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे एकमेव सार्वजनिक विद्यापीठ आहे जिथे अशा प्रकारे ‘प्लेसमेंट सेल अँड कॉर्पोरेशन सेल’ आहे. आतापर्यंत जे सेल स्थापन झाले ते विकेंद्रीत होते मात्र पहिल्यांदा अशा प्रकारे विद्यापीठाचे असे अधिकृत प्लेसमेंट सेल उभं करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. एकाच वेळी अनेक निवडप्रक्रिया, मुलाखती, मेळावे असे अनेक कार्यक्रम घेता येतील अशी याची रचना करण्यात आली आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *