उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Inauguration of Rowing Training Center in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पुणे दि.३- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई, कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका परिसरातील विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री.पवार यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून माहिती घेतली. केंद्राचे समन्वयक कर्नल संदीप चहल यांनी केंद्र व केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण याबाबत माहिती दिली.

केंद्रामार्फत वय वर्षे १३ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांना रोईंग प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण १५ विद्यार्थी खेळाडूंची रोईंग खेळाच्या प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली असून या खेळाडूंना रोईंग प्रशिक्षण आर्मी रोईंग बोड, सी.एम.ई. कासारवाडी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होणार होणार असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले.

यावेळी क्रीडा विभागाच्या सुषमा शिंदे यांनीही क्रीडा विभगाच्यावतीने येथे सुरू असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी रोईंग प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कीट वाटप करण्यात आले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *