‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी आणि अधिकार मंडळाचे उत्तरदायित्व’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन

Inauguration of Workshop on ‘Implementation of National Education Policy 2020 and Responsibility of the Board of Trustees

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी आणि अधिकार मंडळाचे उत्तरदायित्व’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या घटकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी आणि अधिकार

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या
Savitribai Phule Pune University .

मंडळाचे उत्तरदायित्व’ या विषयावर ६ ते ८ मे दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मुळशी तालुक्यातील एका गावात करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते व मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर.डी. कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत ७ मे रोजी करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्या परिषद सदस्य या सर्वांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेची सुरुवात ६ मे रोजी आनंद मापुसकर यांच्या व्याख्यानाने झाली. यावेळी ‘शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ या विषयावर डॉ. बी.एन.जगताप यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. करमळकर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी ‘शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये’ व ‘शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम’ या विषयावर डॉ. आर.डी. कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘उच्च शिक्षणातील संधी व आव्हाने’ या विषयावर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. अंजली कुरणे, डॉ. मनोहर चासकर आणि डॉ. पराग काळकर यांच्या गटचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या विषयावर अनेकांनी आपली प्रेझेन्टेशन दिली.

कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ‘अकॅडमीक क्रेडिट बँक’ या विषयावर डॉ. मिलिंद मराठे यांचे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही.बी.गायकवाड असणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार मार्गदर्शन करणार असून त्यांनतर कार्यशाळेची सांगता होणार आहे. या कार्यशाळेत डॉ. संजय चाकणे, डॉ. प्रभाकर देसाई आणि प्राचार्य मोहन वामन यांनी सूत्रसंचालन केले असून या कार्यशाळेला सर्व निमंत्रितांचा प्रतिसाद लाभला.

हडपसर न्यूज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *