Income Tax Department conducts searches in Mumbai
प्राप्तिकर विभागाची मुंबईत शोधमोहीम
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने 5 जुलै 2022 रोजी कृषी आणि वस्त्रोद्योग व्यापार करणारा गट तसेच आणखी एंट्री ऑपरेटर गट यांच्या संदर्भात शोध आणि जप्ती मोहीम राबविली. मुंबई आणि दिल्ली एनसीआर या ठिकाणच्या एकूण 27 परिसरांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
या तपासणी दरम्यान गुन्हा दर्शवणारे प्रत्यक्ष दस्तावेज आणि डिजिटल माहिती स्वरूपातले पुरावे मोठ्या प्रमाणात आढळून आले.
चौकशीअंती असे आढळून आले की, यातील प्रमुख गटाच्या सूचीबद्ध कंपन्यांची बहुतांश उलाढाल, घोटाळा करण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या चक्राकार व्यापाराद्वारे निर्माण केली जात आहे. या गटाचा प्रवर्तक शेअर दलालांना हाताशी धरून काही विशिष्ट गटांच्या कंपन्यांच्या कामगिरीची पद्धतशीर फेरफार करण्यात सहभागी आहे.
काही शेअर दलालांना खाते पुस्तकात नोंद न ठेवता बेकायदेशीर कारणांसाठी रकमा दिल्या गेल्याचे उघडकीस आले आहे. प्रवर्तक आणि शेअर दलाल अशा दोघांनीही या सर्व अनियमित व्यवहारांची कबुली दिली आहे. रोख रकमेच्या बदल्यात इतर अनेक गटांना अकोमोडेशन एंट्री म्हणजेच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात येऊ नये यासाठी रक्कम विभागून दाखवण्याचे व्यवहार प्रामुख्याने करणाऱ्या एक व्यावसयिक व्यक्ती या गटाला सामील आहे.
या छाप्यादरम्यान हाती आलेल्या पुराव्यांतून असे दिसते की या गटाने 100 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या पॅकिंगसंबंधी साहित्यासह विविध सामानाच्या खरेदीचे बनावट पुरावे सादर करून मोठ्या प्रमाणावर मोठी रक्कम निर्माण केली.एवढेच नव्हे तर या गटाने दीडशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या कृषी तसेच वस्त्रोद्योगाशी निगडीत वस्तूंची बेहिशेबी विक्री केली आहे.
या शोध मोहिमेत रोख रकमेच्या व्यवहारांची हाती नोंद केलेल्या अनेक डायऱ्या देखील सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या शोध मोहिमेतील प्रतिपक्षाचे काही सदस्य आणि या व्यवहारांच्या काही लाभार्थ्यांनी डायरीमधील नोंदी खऱ्या असल्याचे कबुल केले आहे.
अकोमोडेशन एंट्री देणाऱ्या आणखी एका गटाच्या संदर्भात शोध मोहिमा राबविण्यात आल्या. हा गट एलएलपीज, कंपन्या आणि मालकीच्या कंपन्या यांच्यासह विविध विषयांचे परिचालन आणि नियंत्रण करताना आढळून आले आहे आणि त्यातून हा गट शेअर आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या विक्री आणि खरेदी व्यवहाराला अस्सल व्यापाराच्या नावाखाली अकोमोडेशन एंट्री देत आहे असे दिसून आले.
या गटातील प्रमुख व्यक्तींनी विविध लाभार्थ्यांना रोख रकमेच्या बदल्यात खर्च आणि असुरक्षित कर्जासाठी अकोमोडेशन एंट्री दिल्याचे निवेदन शपथेवर दिले आहे. गेल्या काही वर्षांतील अशा व्यवहारांचे प्राथमिक विश्लेषण असे दर्शविते की, शेकडो कोटी रुपयांहून अधिक मूल्याची बनावट कर्जे आणि खर्च स्वरूपातील अकोमोडेशन एंट्री व्यवहार करण्यात आले आहेत.
या शोध मोहिमांमध्ये 1 कोटी 40 लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास जारी आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com