वस्तुंच्या करांमधली वाढ करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी

Union Finance Minister Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Increase in taxes on goods to curb tax evasion – Nirmala Sitharaman

वस्तुंच्या करांमधली वाढ करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वस्तु आणि सेवा कराअंतर्गत अलिकडेच काही वस्तुंच्या करात केलेली वाढ ही करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी केली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Union Finance Minister Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

या निर्णयासंदर्भात सीतारामन यांनी आज ट्विटरवरच्या संदेश मालिकेच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. करचुकवेगिरी रोखण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता. या निर्णयाबाबत अधिकारी, मंत्री गट यांच्यासह विविध पातळ्यांवर विचारविनिमय झाला, आणि अखेरीस सर्व सदस्यांच्या पूर्ण सहमतीनंतरच जीएसटी परिषदेनंही असा निर्णय घेण्याबद्दलची शिफारस केली असं त्यांनी म्हटलं आहे.

या निर्णयाबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, मात्र मागच्या महिन्यात चंदीगढ इथं झालेल्या जीएसटी परिषदेच्या ४७व्या बैठकीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी हजर होती. त्यावेळी मंत्रीगटानं करांच्या सुसूत्रीकरणाचा मुद्दा उपस्थित करत बदलांची शिफारस केली होती, या गटात पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश, गोवा आणि बिहारमधल्या सदस्यांचा समावेश होता आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री या गटाचे अध्यक्ष होते असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

बैठकीतला निर्णय जीएसटी परिषदेनं एकमतानं निर्णय घेतला आणि भाजपाची सत्ता नसलेल्या पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांसह देशातल्या सर्व राज्यांनी या निर्णयाला सहमती दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

जेव्हा वस्तु आणि सेवाकराची सुरुवात झाली, त्यावेळी तेव्हा ब्रँडेड धान्य, डाळी आणि पीठावर पाच टक्के जीएसटी लागू केला होता, नंतर यात सुधारणा करून केवळ नोंदणीकृत ब्रँड किंवा ब्रँडअंतर्गत विकल्या जाणाऱ्या अशा वस्तूंवरच कर आकारला गेला. पण हळूहळू नामांकित उत्पादक आणि ब्रँड मालक या तरतुदींचा गैरवापर करू लागले आणि त्यामुळे या वस्तुंवरच्या वस्तु आणि सेवाकर संकलनात लक्षणीय घट होऊ लागल्याचं निदर्शनाला आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ही बेसुमार कररी राज्यांनीही अनुभवली आहे असंही सीतारामन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. ही बाब लक्षात आल्यामुळेच अशा वस्तुंवर कर भरत असलेल्या पुरवठादार आणि उद्योग संघटनांनी नाराजी व्यक्त करत, हा गैरवापर थांबवण्याची आणि पाकिटबंद वस्तुंवर समान कर आकारण्याची मागणी केली होती अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या
जीएसटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरनं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *