जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव, संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

In view of the increasing incidence of lumpy skin disease in animals, the entire state has been declared a controlled area

जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव, संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

मुंबई : जनावरांमधल्या लंपी चर्मरोगाचा  वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे  नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण, सांसर्गिक रोगास प्रतिबंध  आणि  नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनानं संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. या अधिसूचनेचं पालन करण्याचं  आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी  यांनी केलं  आहे.overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

शासनानं ८ सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली. लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये ८ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

गुरं  आणि म्हशींच्या  मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि  कश्मीर, अंदमान, निकोबार, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना आणि  पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचं  दिसून आलं आहे.

राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी  आणि  कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारनं सर्व राज्यांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करत असल्याचं समोर आलं आहे. बाधित परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार आणि जत्रा, प्रदर्शन आयोजीत करण्यास प्रतिबंध घालण्याच आला  आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *