India all out for 404 runs in their first innings against Bangladesh.
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या ४०४ धावा
बांगलादेश भारतापेक्षा २७१ धावांनी पिछाडीवर
फॉलोऑन टाळण्यासाठी ७२ धावांची गरज
चट्टग्राम : भारत आणि बांग्लादेश यांच्यात चट्टग्राम इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं मजबूत पकड घेतली आहे. सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ४०४ धावांवर आटोपला.
श्रेयस अय्यर ८६ धावा करून बाद झाल्या नंतर, अर्धशतकवीर आर अश्विन आणि कुलदीप यादव याच्या ४० धावांच्या खेळीमुळे भारताला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कुलदीप यादवच्या अष्टपैलू कामगिरीने भारताने सामन्यावर आपली पकड घट्ट केली. २२ महिन्यांहून अधिक काळानंतर आपली पहिली कसोटी खेळताना, नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्याने प्रथम ११४ चेंडूंत (५ × ४) करिअरमधील सर्वोत्तम ४० धावा करत अनुभवी रविचंद्रन अश्विन (५८; ११३ चेंडू ) सोबत आठव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करून भारताला ४०४ धावांपर्यंत मजल मारली.
बांगलादेशच्या मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम या गोलंदाजांनी भारताचे प्रत्येकी चार गडी बाद केले.
त्यानंतर पहिल्या डावासाठी फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशाचा डाव मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर गडगडला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर बांग्लादेशानं सलामीवीर नजमूल शांतो याला गमावलं.
त्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. दिवसअखेर बांग्लादेशानं ८ गडी गमावून १३३ धावा केल्या होत्या. भारताच्या कुलदीप यादव यानं चार बळी घेतले तर मोहम्मद सिराज यानं तीन बळी घेतले.
बांगलादेश भारतापेक्षा २७१ धावांनी पिछाडीवर आहे. दोन विकेट्स शिल्लक असताना यजमानांना फॉलोऑन टाळण्यासाठी ७२ धावांची गरज आहे. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक २८ धावा केल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com