India and USA should work together to strengthen economic ties – Piyush Goyal
भारत आणि अमेरिकेचे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी एकत्र काम करावं – पीयूष गोयल
लॉस एंजेलिस : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करावं असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लॉस एंजेलिसमध्ये यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलं.
भारताने या वर्षी अमेरिकेशी दोन मुक्त व्यापार करार अंतिम केले असून या वर्षाच्या अखेरीस आणखी किमान दोन मुक्त व्यापार करार पूर्ण होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
श्री. गोयल यांनी यावर भर दिला की जगभरातील 30 दशलक्ष भारतीय डायस्पोरासोबत काम करणे आणि अमेरिका आणि युरोप सारख्या मैत्रीपूर्ण देशांसोबत काम केल्याने इतिहासाची वाटचाल लक्षणीयरीत्या बदलू शकते.
पुढील 25 ते 30 वर्षात भारत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे याचा पुनरुच्चार करून, त्यांनी भारतीय डायस्पोरांना भारताच्या विकासाची कहाणी देत असलेल्या संधीचा लाभ घेण्यास सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com