India beat Bangladesh by five runs in the T20 Cricket World Cup
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशावर पाच धावांनी विजय
ॲडलेड: T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
के.एल. राहुलनं 32 चेंडूत 50 धावा तर विराट कोहलीनं 44 चेंडूत केलेल्या नाबाद 64 धावांच्या खेळीमुळे भारताला निर्धारीत 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा करता आल्या. त्यात सूर्यकुमार यादवनं30 धावांचं मोलाचं योगदान दिलं. बांगलादेशातर्फे हसन मेहमूदनं 3 तर शकील अल हसननं 2 गडी बाद केले.
पावसाचा व्यत्यय आल्यामुळे बांगलादेशाला विजयासाठी16 षटकात 151 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र त्यांना 6 गडी गमावून 145 धावाच करता आल्या.
लिटन दासनं 27 चेंडूत केलेली60 धावांची झुंजार खेळी इतरांची साथ न मिळाल्यानं संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. भारतातर्फे अर्शदीप सिंग आणि हार्दीक पांड्यानं प्रत्येकी दोन, तर महम्मद शमीनं एक बळी मिळवला.
बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 27 चेंडूत 60 धावा केल्या.
भारताकडून अर्शदीप सिंगने (2/38) दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक :
भारत 20 षटकांत 6 बाद 184 (विराट कोहली नाबाद 64, केएल राहुल 50; हसन महमूद (3/47).
बांगलादेश : 16 षटकांत 6 बाद 145 (लिटन दास 60; अर्शदीप सिंग 2/38).
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com