India defeated Pakistan by four wickets in T-20 World Cup
टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान वर विजय
आयुष्यातील “सर्वोत्तम सामन्यांपैकी एक” : विराट कोहली
मेलबर्न : टी ट्वेंटीविश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिले होत.
विराट कोहलीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 90,000 चाहत्यांसमोर भारताने 2007 नंतरच्या पहिल्या T20 विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीयांनी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना 159-8 पर्यंत रोखले आणि सुपरस्टार कोहलीच्या खेळा मुळे अंतिम षटकात चार विकेट्सने मात केली. तत्पूर्वी भारताने 10 षटकांत केवळ 45-4 धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहलीने 82 धावांची धडाकेबाज खेळी केली,तर त्याला हार्दिक पंड्यानं 40 धावा करत संयमी साथ दिली.
शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर आर. अश्विन मैदानात आला आणि त्यानं विजयी फटका मारत भारताच्या विजयाची नोंद केली.
स्पर्धेच्या सुपर ट्वेल फेरीसाठीच्या दुसऱ्या गटातल्या या सामन्यात, भारतानं नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. अवघ्या १५ धावांतच पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत गोलंदाजांनी भारताला चांगली सुरूवात मिळवून दिली.
त्यानंतर अर्धशतकवीर इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांनी 76धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. पण नंतर पुन्हा ठराविक अंतरानं गडी बाद करत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला निर्धारीत 20 षटकांमध्ये8 गडी बाद 159 धावांवर रोखलं.
पाकिस्तानच्या वतीनं इफ्तिखार अहमद यानं 51तर शान मसूद यानं नाबाद 52 धावा केल्या. भारताच्या वतीनं अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानचे प्रत्येकी 3 तर महम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की हा त्याच्या आयुष्यातील “सर्वोत्तम सामन्यांपैकी एक” होता आणि त्याने 2016 ICC T20 विश्वचषक दरम्यान मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या त्याच्या खेळीपेक्षाही चांगली खेळी असल्याचे सांगितले.
स्पर्धेत आज पहिल्या गटात श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात, श्रीलंकेनं आर्यलंडला9 गडी आणि 5 षटकं राखून हरवलं. या सामन्यात आर्यलंडनं श्रीलंकेसमोर विजयासाठी129 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेनं 15 षटकांमध्ये केवळ 1 गडी गमावून 133 धावा करत विजय मिळवला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान वर विजय”