India to face England in Women’s Cricket World Cup tomorrow
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा इंग्लंडसोबत सामना.
वेलिंग्टन : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा चौथा सामना उद्या वेलिंग्टन इथं गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे.
याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतानं पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने जिंकले असून, यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला, तर इंग्लंडनं या स्पर्धेत सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत.
या स्पर्धेतल्या सामन्यांचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या सर्व मुख्य वाहिन्यांवरुन तसंच एफ एम रेनबो, डीआरएफ आणि डीटीएच वरुन देशभर केलं जात आहे.