India has given priority to establishing ties with Central Asian countries: President
मध्य आशियातल्या देशांशी संपर्क प्रस्थापित करण्याला भारतानं प्राधान्य दिलं आहे- राष्ट्रपती
अश्गबत: मध्य आशियातल्या देशांशी संपर्क प्रस्थापित करण्याला भारतानं प्राधान्य दिलं आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सांगितलं. तुर्कमेनीस्तान दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आज अश्गबत इथं आंतरराष्ट्रीय संबंध संस्थेत ते बोलत होते.
भारत हा आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्ग आणि अश्गबत करार यो दोन्हीचा सदस्य आहे. मध्य आशियातल्या देशांना समुद्रातून सुरक्षित आणि विनाअडथळा प्रवास करणं शक्य होण्यासाठी इराणमधे चाबहार बंदर कार्यन्वित करण्यासाठी पावलं उचलली आहेत, असं त्यांनी सांगितलं.
संर्पकाचा विस्तार करताना चर्चा करुन, सहभागातून, पारदर्शीपणे तसंच सर्व देशांची सार्वभौमता आणि प्रादेशिक एकात्मता यांचा सन्मान राखून पावलं उचलणं महत्वाचं आहे, असं ते म्हणाले. या भागात संपर्क बांधणीसाठी, गुंतवणुकीसाठी, तसंच सहकार्य करण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.
जगातली एक महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढं आल्यानं तसंच भारताच्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांमुळे जागतिक पातळीवरच्या चर्चांना आकार मिळाला आहे. दक्षिणेतल्या देशांशी भारताची भागीदारी लक्षणीयरित्या वाढली असून, प्रमुख सत्तांशी संबंध अधिक दृढ झाले आहेत, असं ते म्हणाले. भारताच्या परराष्ट्र धोरणामधे अलीकडच्या काळात शेजारी प्रथम या धोरणाला महत्व मिळालं आहे, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षात मध्य आशियातल्या देशांशी असलेले ऐतिहासिक संबंध पुन्ह मजबूत करण्यावर भारताच्या परराष्ट्र धोरणाच भर राहिला आहे. विकसनशील देश म्हणून मध्य आशियातले देश आणि भारताचा दृष्टीकोन समान असून, आपल्यापुढची दहशतवाद, कट्टरवाद, अंमलीपदार्थांची तस्करी यासारखी आव्हानंही समान आहेत, असं ते म्हणाले.
राष्ट्रपतींनी या संस्थेतल्या ‘इंडिया कॉर्नर’चं उद्धाटनही केलं. त्याआधी कोविंद यांनी अश्गबतमधल्या पिपल्स मेमोरिअस कॉमप्लेक्सला भेट दिली आणि मोन्यूमेंट ऑफ इटर्नल ग्लोरीवर पुष्पचक्र वाहिलं. त्यांनी बाक्तीयार्लिक क्रीड संकुलाही भेट दिली. तिथल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजली वाहिली. भारतीय प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या योग प्रात्यक्षिकांनाही ते उपस्थित राहिले. तुर्कमेनिस्तानचा हा दौरा आटपून राष्ट्रपती उद्या सकाळी नेदरलँडला रवाना होतील.
Hadapsar News Bureau.