एकविसाव्या शतकात भारत जगासाठी आशेचा किरण

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

The Prime Minister believes that India is a ray of hope for the world in the twenty-first century

एकविसाव्या शतकात भारत जगासाठी आशेचा किरण असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

बाली : बाली येथे आज झालेल्या G20 शिखर परिषदेच्या समारोपीय सत्रात भारताला G20 चे अध्यक्षपद सुपूर्द करण्यात आले. पुढील महिन्याच्या १ तारखेपासून भारत अधिकृतपणे G20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.
File Photo

समारोपाच्या सत्रात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-20 अध्यक्षपदाची प्रतिकात्मक सूत्रे सुपूर्द केली.

बाली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेच्या समारोपीय सत्रात बोलताना श्री. मोदी म्हणाले, देशाने G20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. ते म्हणाले, जेव्हा जग भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि साथीच्या रोगाचे दीर्घकालीन दुष्परिणाम यांच्याशी झुंजत आहे अशा वेळी भारत G20 ची जबाबदारी घेत आहे.

तत्पूर्वी इंडोनेशियातील बाली इथं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं. भारत हा 21 व्या शतकात जगासाठी आशेचा किरण आहे. भारत अभूतपूर्व वेगानं वाटचाल करत असून, देशातील प्रतिभा, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उद्योगांनी जगभरात आपला ठसा उमटवला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. इंडोनेशियाच्या विकास आणि समृद्धीमध्ये भारतीय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

त्यांनी दिलेल्या योगदानाचा देशाला अभिमान वाटतो, असंही मोदी म्हणाले.इंडोनेशिया आणि भारतातील घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले, भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान समान सांस्कृतिक वारसा आहे. दोन्ही देशांमध्ये बरेच साम्य आहे.

बालीपासून 1500 किलोमीटर दूर, ओडिशातील कटक इथं बाली जत्रा महोत्सव साजरा केला जात असून, हा महोत्सव हजारो वर्षे जुन्या भारत-इंडोनेशिया व्यापारी संबंधाचं प्रतीक आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारतात भव्य राम मंदिर आकार घेत असताना भारताला इंडोनेशियातील रामायण परंपरा अभिमानाने आठवते, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. आव्हानात्मक काळात भारत इंडोनेशियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, 2018 मध्ये इंडोनेशियात मोठा भूकंप झाला तेव्हा भारताने ऑपरेशन समुद्र मैत्री सुरू केलं होतं, याची आठवण त्यांनी करुन दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *