India is the fastest growing economy in the world
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे
– हर्षवर्धन शृंगला, भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) लवळे येथे जी-20 विद्यापीठ कनेक्ट
पुणे: भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. असे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले. देशांना एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन जागतिक स्तरावर मोलाचा आहे आणि यामुळे भारताला एक मजबूत राष्ट्र म्हणून जागतिक संकटातून बाहेर पडून महामारीच्या काळात एक लवचिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.
ब्रीक्स , शांघाय सहकार्य आणि संयुक्त राष्ट्र स्थायी सदस्य जी 20 मधील सदस्य आहेत, असे शृंगला यांनी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) लवळे येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट कार्यक्रमात बोलताना सांगितले.
बहुध्रुवीय जगामधील परिवर्तन जागतिक वृद्धीसाठी साठी प्रयत्नशील असेल आणि वसुधैव कुटुंबकम’ हे ब्रीदवाक्य कायम ठेवेल. विविध सामाजिक-आर्थिक, भौगोलिक-राजकीय आणि सांस्कृतिक अनुभवाने भारत ऐतिहासिकदृष्ट्या सुसज्ज असून ही सुसज्जता युद्धे, संघर्ष आणि आर्थिक चिंता हाताळण्यासाठी देशाला सुस्थितीत ठेवते , असे त्यांनी सांगितले.
जी -20 अध्यक्षपदाच्या अंतर्गत केवळ देशाच्या राजधानीतच नाही तर संपूर्ण भारतात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणपासून अरुणाचल प्रदेशच्या खोऱ्यापर्यंत जी 20 चे कार्यक्रम होत आहेत, असे ते म्हणाले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती प्रा. (डॉ.) एस बी मुजुमदार म्हणाले की, शिक्षण हे आंतरराष्ट्रीयीकरणाचे सर्वोत्तम माध्यम आहे सिम्बायोसिस मध्ये भारतीय आणि परदेशी विद्यार्थी एकत्र राहून परस्परांना सहकार्य करतात असे डॉ.मुजुमदार यांनी सांगितले. सिम्बायोसिसने सुरुवातीपासूनच ‘वसुधैव कुटंबकम’ या ब्रीदवाक्याचे पालन केले आहे जे भारताचे जी 20 अध्यक्षपदाचे बोधवाक्य आहे, असे त्यांनी सांगितले. जी 20 देशांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विद्वानांसाठी 20 शिष्यवृत्तीची घोषणा मुजुमदार यांनी केली.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी स्वागत केले तर कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com