India is the largest ‘connected’ country in the world today
800 दशलक्षाहून अधिक ब्रॉडबँड ग्राहक असलेला भारत हा आज जगातील सर्वात मोठा ‘कनेक्टेड’ देश आहे
: राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे प्रतिपादन
इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2022 च्या समारोप समारंभात राजीव चंद्रशेखर यांचे मार्गदर्शन
नवी दिल्ली : भारत आज 800 दशलक्षाहून अधिक ब्रॉडबँड वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठा ‘कनेक्टेड’ देश बनला आहे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री, श्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
ते काल येथे ‘इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2022’ च्या समारोप समारंभामध्ये बोलत होते. ‘लेव्हरेजिंग टेकेड फॉर एम्पॉवरिंग भारत’ ही या परिषदेची संकल्पना होती.यावेळी मेटी(MeitY) सचिव अल्केश कुमार शर्मा आणि इतर मान्यवरही या समारंभाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, 800 दशलक्ष भारतीय ग्राहक असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा ‘कनेक्टेड’ देश आहे.
फाईव्ह जी(5G) आणि भारतनेट या सर्वात मोठ्या ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी नेटवर्क असलेल्या प्रकल्पाचे 1.2 अब्ज भारतीय ग्राहक असतील, जी जागतिक इंटरनेट उद्योगातील एकमात्र सर्वात मोठी संख्या असेल.ते पुढे म्हणाले की, आम्हाला भविष्यात तांत्रिक नवोन्मेष तसेच अद्ययावत नियामक धोरणे सुसंगत करण्याची आकांक्षा आहे.सर्व भागधारकांचा सखोल सहभाग हा या जागतिक संगणकीय गुन्हेगारी विरोधी कायद्याच्या मानांकनाचा आराखडा ( ग्लोबल स्टँडर्ड सायबर लॉ फ्रेमवर्क)याचा तिसरा टप्पा असेल जो भारतीय इंटरनेट आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण करेल अशी आम्हाला आशा वाटते,असेही ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com