India, Japan sign six agreements in cyber-security, clean energy, infrastructure and urban development
भारत आणि जपानमध्ये सायबर-सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि शहरी विकास या सहा करारांवर स्वाक्षरी
नवी दिल्ली: भारत आणि जपान यांनी काल नवी दिल्ली येथे 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेनंतर सायबर सुरक्षा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छ ऊर्जा यासह सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सकारत्मक चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
मोदी आणि किशिदा यांच्यातही शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. इंडो-पॅसिफिक प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी भागीदारी पुढे नेण्यासाठी त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.
भारत आणि जपान यांच्यात त्यांच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या कक्षेत बहुआयामी सहकार्य आहे. वार्षिक शिखर परिषदेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली.