India lead 2-1 in India vs West Indies cricket match
भारतीय संघानं वेस्ट इंडीज संघाचा 7 गडी राखून केला पराभव
भारत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्यात भारताची 2-1 अशी आघाडी
सेंट किट्स : भारत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघादरम्यान काल सेंट किट्स इथं खेळल्या गेलेल्या 20 षटकांच्या सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडीज संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. यजमान वेस्ट इंडीज संघानं प्रथम फलंदाजी करत भारतीय खेळाडूंसमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
वेस्ट इंडिजकडून सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक 50 चेंडूत 73 धावा केल्या, तर रोव्हमन पॉवेलने 23 धावांचे योगदान दिले आणि त्याला पूरन (22) आणि रोव्हमन पॉवेल (23) यांच्याकडून मोठी मदत मिळाली.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने 35 धावांत दोन तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी एक बळी घेतला.
सूर्याकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर, भारतीय संघानं 19 षटकातच लक्ष्य साध्य केलं.
भारताने 165 धावांचे लक्ष्य सहा चेंडू राखून पार केले. सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत 76 धावा केल्या. ऋषभ पंत 26 चेंडूत 33 धावांवर नाबाद राहिला.
वेस्ट इंडिजकडून अकेल होसेन, डॉमिनिक ड्रेक्स आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताने पहिला T20I 68 धावांनी जिंकला होता आणि दुसरा सामना पाच गडी राखून गमावला होता.
यापुढील दोन्ही सामने येत्या शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खेळले जाणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com