इंडिया पोस्ट आता कोट्यवधी व्यापाऱ्यांसाठी बनले लॉजिस्टिक भागीदार

भारतीय टपाल विभाग India Post logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

India Post has now become a logistics partner for crores of traders

इंडिया पोस्ट आता कोट्यवधी व्यापाऱ्यांसाठी बनले लॉजिस्टिक भागीदार

लहान शहरं आणि ग्रामीण भागात ऑनलाइन विक्री होणाऱ्या वस्तूंचे वितरण होण्यासाठी टपाल विभागाचा व्यापारी संघटनेशी करार

ट्रीपटा टेक्नॉलॉजीज बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरीभारतीय टपाल विभाग India Post logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

नवी दिल्ली : केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे इंडिया पोस्ट विभागाने अखिल भारतीय व्यापारी महासंघ (सीएआयटी) आणि ट्रिप्टा टेक्नोलॉजीज यांच्याशी सामंजस्य करार केला.

या करारान्वये ‘भारत ईमार्ट’ या पोर्टलचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या कार्यस्थळावरुन मालाची खेप उचलली जाण्याची सोय झाली असून देशभरात जेथे हा माल पोहोचणे अपेक्षित आहे तेथे पोहोचण्याची सुनिश्चिती झाली आहे. या सुविधेचा लाभ सीएआयटीशी जोडल्या गेलेल्या सुमारे आठ कोटी व्यापाऱ्यांना होईल असा अंदाज आहे.

देशातल्या छोट्या शहरांना आणि ग्रामीण भागाला ई-कॉमर्सच्या कक्षेत आणण्यासाठी, भारतीय टपाल विभागानं आज अखिल भारतीय व्यापार संघटना आणि ट्रीपटा टेक्नॉलॉजीज बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारामुळे टपाल विभागाला देशभरात मालवाहतूक सेवा पुरवठादार म्हणून काम करता येईल. या भागीदारीचा फायदा देशातल्या लहान आणि मध्यम स्तरावरच्या व्यापाऱ्यांना होणार असून, अखिल भारतीय व्यापार संघटनेचा प्रमुख आधार असलेल्या असंघटीत क्षेत्रातल्या व्यापाऱ्यांना देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सेवा देता येईल.

भारतीय टपाल विभागाची पार्सल सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं दळणवळण राज्य मंत्री देवीसिंह चौहान यांनी यावेळी सांगितलं. सेवा क्षेत्राचा विस्तार करून आणि तंत्रज्ञानाचा समावेश करून सरकारने टपाल विभागाचा कायापालट केल्याचं ते म्हणाले. टपाल विभागानं आर्थिक समावेशन सेवांबरोबर बँकिंग आणि वीमा सेवा देखील सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, या विभागाने कोविड-19 च्या काळात तंत्रज्ञानाची मदत घेऊन डिजिटल आर्थिक व्यवहार तसेच ऑनलाईन सेवा वितरण सुरु करून या संकटाचे संधीमध्ये रुपांतर केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *