India reached the final of the Asia Cup Women’s T20 Cricket Tournament
आशिया चषक महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक
दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा पाकिस्तानवर एका धावेनं विजय
बांगलादेशात सुरु असलेल्या आशिया चषक महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होणार आहे.
आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं थायलंडचा 74धावांनी पराभव केला. भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 148 धावा केल्या.प्रथम फलंदाजी करताना भारताने शफाली वर्माच्या 42 आणि हरमनप्रीत कौरच्या 36 धावांच्या जोरावर 20 षटकांत 148 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने 27धावा केल्या.
थायलंडतर्फे सोर्नारिन टिपोचने तीन तर थिपाचा पुथावोंग, फनिता माया आणि नट्टाया बूचाथम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या धावसंख्येचा पाठलाग करताना थायलंडचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 74धावाच करु शकला. थायलंडसाठी, नरुमोल चाईवाई आणि नट्टाया बूचाथम या दोघांनीही प्रत्येकी 21 धावा केल्या, कोणताही फलंदाज दुहेरी अंकी धावा करू शकला नाही. भारताकडून दीप्ती शर्माने तीन, राजेश्वरी गायकवाडने दोन आणि रेणुका सिंग, स्नेह राणा आणि शफाली वर्माने प्रत्येकी एक गडी बाद केला.
शफाली वर्माला तिच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर घोषित करण्यात आले.
श्रीलंकेचा पाकिस्तानवर एका धावेनं विजय
दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानवर एका धावेनं विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 122 धावा केल्या. श्रीलंकेकडून हर्षिता मडावीने 35 तर अनुष्का संजीवनीने 26 धावा केल्या. पाकिस्तानला 20 षटकात 6गडी गमावून 121 धावाच करता आल्या.
दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्यांमध्ये या महिन्याच्या 15 तारखेला अंतिम सामना खेळवला जाईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com