जगातल्या सर्वाधिक श्रेष्ठ पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारत पाचव्या स्थानावर

International Monetary Fund आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

India surpasses United Kingdom to become World’s 5th biggest economy

जगातल्या सर्वाधिक श्रेष्ठ पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारत पाचव्या स्थानावर

वॉशिंग्टन: भारताने ग्रेट ब्रिटनला मागे टाकत जगातल्या ५ मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे . एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्याInternational Monetary Fund आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  अंदाजानुसार, भारतानं  या वर्षी, वार्षिक आधारावर ग्रेट ब्रिटनला  मागे टाकत ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. यामुळे भारत, आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या मागे आहे.  ही गणना यूएस डॉलरवर आधारित आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जीडीपीच्या आकडेवारीनुसार भारताने पहिल्या तिमाहीत आपली आघाडी वाढवली आहे.

एका दशकापूर्वी, भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ११ व्या क्रमांकावर होता, तर ग्रेट ब्रिटन ५ व्या क्रमांकावर होता. असंही सीतारामन म्हणाल्या,
सुधारणा करा, कृती करा आणि परिवर्तन करा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्राला अनुसरून  नवभारत  यशाची नवी पाने लिहित आहे, असं प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी केलं. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे, असंही ते म्हणाले.

भारत यूकेला मागे टाकून जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याने, EGROW फाउंडेशनचे अर्थशास्त्रज्ञ आणि सीईओ डॉ. चरण सिंग यांनी सणासुदीच्या काळात सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी असल्याचे म्हटले आहे.  भारताने 2022 मध्ये जीडीपीच्या आकडेवारीत यूकेला मागे टाकले आहे आणि 2027 पर्यंत ते आर्थिक कामगिरीच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा खूप जास्त असेल. सिंग म्हणाले, जग मंदीच्या उंबरठ्यावर असताना भारताचा विकास दर ७ टक्क्यांनी होत आहे.

एका दशकापूर्वी, भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या क्रमांकावर होता, तर यूके 5 व्या क्रमांकावर होता.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *