भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असा जागतिक बँकेला विश्वास

World Bank हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The World Bank believes that India will be the fastest growing economy

जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असा जागतिक बँकेला विश्वासWorld Bank हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वासाला पुन्हा एकदा दुजोरा दिला आहे. जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं जागतिक बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६ पूर्णांक ६ टक्के असेल असा अंदाज जागतिक बँकेनं ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स नावाच्या आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाचा वृद्धी दर ९ पूर्णांक ७ टक्के राहण्याची शक्यता आहे.

जागतिक अर्थव्यवस्था वृद्धीदर यावेळी अर्धा ते पावणे २ टक्के राहण्याची शक्यता आहे. पूर्वी हा दर ३ टक्के राहील, असं जागतिक बँकेनं म्हटलं होतं. यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या निकट येईल, अशी भीतीही जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे. अमेरिका, युरोप आणि चीनच्या अर्थव्यवस्था कमजोर राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *