राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 5 व्या दिवशी भारताने जिंकली 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके

Birmingham Commonwealth Games बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsराष्ट्रकुल स्पर्धा 2022 Commonwealth Games 2022

India wins 2 gold and 2 silver medals on day 5 of CWG 2022

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 5 व्या दिवशी भारताने जिंकली 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके

लॉन बॉल्सच्या ऐतिहासिक सुवर्ण पदकानंतर, भारताने पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये सुवर्ण, बॅडमिंटन मिश्रमध्ये रौप्य आणि भारोत्तोलनात पुरुषांच्या 96 किलो वजनीगटात जिंकले रौप्यपदक

नवी दिल्‍ली :  बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 5 व्या दिवशी भारताने 4 पदके जिंकली. महिलांच्या लॉन बॉल्स संघाच्या ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर पुरुष टेबल टेनिस संघाने अंतिम फेरीत सिंगापूरचा 3-1 असा पराभव करून दिवसातले दुसरे सुवर्णपदक जिंकले.  त्यानंतर भारत्तोलक विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले आणि बॅडमिंटन मिश्र संघाने अंतिम फेरीत मलेशियाकडून पराभव झाल्याने रौप्य पदक जिंकले.  5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारताच्या पदकांची संख्या 13 वर पोहोचली आहे.Birmingham Commonwealth Games बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी या कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिस संघाचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींनी आपल्या  ट्वीट संदेशात म्हटले, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकल्याबद्दल साथियन ज्ञानसेकरन, शरथ कमल, हरमीत देसाई आणि सनील शेट्टी यांचे अभिनंदन. त्यांनी कमालीचे कौशल्य आणि धैर्य दाखवले.  त्यांनी देशाची मने जिंकली आहेत. मला खात्री आहे की हा पराक्रम आपल्या तरुणांना प्रेरणा देईल.”

बॅडमिंटन संघाचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी आपल्या ट्विट संदेशात म्हचले , “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाच्या सदस्यांचे मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. त्यांनी दाखवलेले कौशल्य, सांघिक खेळ  आणि लढाऊ वृत्ती उल्लेखनीय आहेत.  मी सर्व खेळाडूंचे कौतुक करते.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिस संघाचे, रौप्य पदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटन संघाचे आणि भारत्तोलक विकास ठाकूरचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी. साथियान, हरमीत देसाई, शरत कमल आणि सनील शेट्टी यांचे अभिनंदन केले आहे.  पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, “टेबल टेनिसमधील आनंदाची बातमी! जी. साथियान, हरमीत देसाई, शरत कमल आणि सनील शेट्टी यांच्या जबरदस्त संघाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. या संघाने उच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत, मग ते कौशल्य असो किंवा  दृढनिश्चय. त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “@srikidambi, @satwiksairaj, @buss_reddy, @lakshya_sen, @Shettychirag04, Treesa Jolly, Aakarshi Kashyap, @P9Ashwini, गायत्री गोपीचंद आणि @Pvsindhu1 च्या भारतीय बॅडमिंटन संघाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.”

दुसर्‍या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “बॅडमिंटन हा भारतातील सर्वात आवडत्या खेळांपैकी एक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील रौप्य पदकामुळे, हा खेळ आणखी लोकप्रिय होईल आणि भविष्यात अधिकाधिक लोक या खेळाकडे आकर्षित होतील.”

भारोत्तोलक विकास ठाकूरचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधानांनी ट्विट केले, “भारोत्तोलनामध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या विकास ठाकूरमुळे या वेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अधिकच झळाळी प्राप्त झाली.  त्याच्या यशाने आनंद झाला. त्याचे खेळाप्रती असलेले समर्पण वाखाणण्याजोगे आहे.  त्याला आगामी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा.”

क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. ट्विट संदेशात त्यांनी म्हटले, “आणखी एक जादुई सुवर्णपदक. भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाची उत्कृष्ट कामगिरी. शरथ कमल, जी. साथियान आणि हरमीत देसाई यांच्या नेतृत्वाखालील आमच्या बॅडमिंटनपटूंनी बलाढ्य सिंगापूरला 3-1 ने पराभूत केले. आम्ही यशस्वीपणे मुकुट राखला !”

आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये ठाकूर म्हणाले, “भारतीय बॅडमिंटन मिश्र संघाने रौप्य #CWG2022 जिंकण्यासाठी जोरदार संघर्ष केला!!  चिराग आणि सात्विकच्या पुनरागमनासाठी आणि सिंधूच्या अतुलनीय आत्मविश्वासाला सलाम!  किदंबीचा दमदार खेळ हा क्रीडा चाहत्यांसाठी मेजवानीच होती.  ट्रीसा जॉली आणि गायत्री पुलेला यांनी त्यांचा लढाऊ बाणा दाखवला!”

विकासचे अभिनंदन करताना ठाकूर यांनी  ट्विट केले, “विकास ठाकूरने  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात अंतिम फेरीत स्नॅच- 155 किलो, क्लीन अँड जर्क- 191 किलो असे  एकूण 346 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकून सलग तिसरे पदक जिंकले!”ही लक्षणीय कामगिरी आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *