राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कास्य पदकांची कमाई

Birmingham Commonwealth Games बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsराष्ट्रकुल स्पर्धा 2022 Commonwealth Games 2022

India won 13 gold, 11 silver and 16 bronze medals at the Commonwealth Games

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कास्य पदकांची कमाई

बर्मिंगहम : बर्मिंगहम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल शानदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. आतापर्यंत भारताने १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कास्य पदकं मिळवली असून पदक तालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. भारतीय पैलवानांनी काल कुस्तीमध्ये हॅटट्रीक करत आणखी एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.Birmingham Commonwealth Games बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsराष्ट्रकुल स्पर्धा 2022 Commonwealth Games 2022

रविकुमार दहिया, नवीन कुमार यांनी त्यांच्या गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर ५४ किलो वजनी गटात विनेश फोगाट हिने सुवर्ण पदक मिळवलं. सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचा विक्रम करणारी विनेश फोगाट पहिली महिला कुस्तीगीर ठरली आहे. महिलांच्या ७६ किलो वजनी गटात पूजा सिहागला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं.

पुरुषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत ६७ किलो वजनी गटात रोहित टोकसनं कांस्य पदक पटकावलं. बॅडमिंटनमध्ये पी वी सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरद कमलनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. अविनाश साबळेनं ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात ८ मिनिटे ११ पॉईटचा नवा विक्रम नोंदवत रौप्य पदकाला गवसणी घातली.

महिलांच्या १० हजार मीटर रेसवॉकच्या अंतिम फेरीत प्रियांका गोस्वामीने दुसरं रौप्य पदक जिंकले, तर लॉन बाऊल चौकार स्पर्धेत भारतीय पुरूष संघानं रौप्य पदक मिळवलं.

राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या मर्यादित वीस षटकांच्या सामन्यात भारतीय महिला संघानं इंग्लंडचा चार धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पॅरा टेबल टेनिस मध्ये भारताच्या भविना पटेलनं सुवर्णपदक तर सोनलबेन पटेलनं कांस्य पदकाची कमाई केली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *