India won the first T20 match against West Indies by 68 runs
वेस्ट इंडिजबरोबरचा पहिला टी-ट्वेंटी सामना भारतानं ६८ धावांनी जिंकला
पोर्ट ऑफ स्पेन: वेस्टइंडीज मध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं तारौबा मैदानावर झालेल्या मालिकेतल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं विंडीजवर ६८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
विंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं २० षटकांमध्ये ६ बाद १९० अशी धावसंख्या उभारली. कर्णधार रोहित शर्माच्या ४४ चेंडू ६४ धावा आणि दिनेश कार्तिकच्या १९ चेंडूत नाबाद ४१ या झंझावाती खेळींमुळे भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
वेस्ट इंडिजसाठी अलझारी जोसेफने 46 धावांत 2 बळी घेतले.
भारताचं आव्हान पेलू न शकलेला विंडीजचा संघ, २० षटकात ८ गडी बाद १२२ धावाच करू शकला. अर्षदीप, रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन, तर भुवनेश कुमार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीजच्या शमरह ब्रुक्सने सर्वाधिक 20 धावा केल्या. दिनेश कार्तिक सामनावीर ठरला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना सोमवारी सेंट किट्समधील बासेटेरे येथील वॉर्नर पार्क येथे खेळवला जाईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com