India won the series! South Africa lost by seven wickets
भारताने मालिका जिंकली! दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखत केला दारूण पराभव
कुलदीप यादव सामनावीर तर तीनही सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज मालिकावीर
नवी दिल्ली : शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारताने नवी दिल्लीतील तिसर्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला. यासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी खिशात घातली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजांनी कर्णधार शिखर धवनचा विश्वास सार्थ ठरवला.
भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना 27.1 षटकांत 99 धावांत गुंडाळले, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.
कुलदीप यादवच्या जादुई फिरकीने भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ९९ धावांत रोखले. कुलदीप यादवने गोलंदाजी केलेल्या ४.१ षटकात चार विकेट्स घेत सर्वाधिक बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेने थोड्या अंतराने विकेट गमावल्यामुळे त्यांना सूर सापडला नाही. शिखर धवनने पाहुण्यांना फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने क्विंटन डी कॉकला 6 धावांवर बाद करून चांगली सुरुवात करून दिली
त्यानंतर मोहम्मद सिराजने जलद अंतराने जनेमन मलान आणि रीझा हेंड्रिक्सला बाद केले. एडेन मार्करामही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला, तो शाहबाज अहमदविरुद्ध 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर सुंदरने स्टँड-इन कर्णधार डेव्हिड मिलरला 7 धावांवर क्लीन केले. त्यानंतर कुलदीपने दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाला झटपट गुंडाळले.
100 धावांचा पाठलाग करताना धवन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. कर्णधार शिखर धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला व ८ धावांवर धावबाद झाला, इशान किशनला फॉर्चुनने १० धावांवर बाद केले. सलामीवीर गिलने 49 धावा केल्या. फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरने नंतर स्टाईलमध्ये शो गुंडाळला कारण भारताने केवळ 19.1 षटकांत धावांचे आव्हान पूर्ण केले.
चार गडी बाद करण्याऱ्या कुलदीप यादव याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तीनही सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज मालिकावीर ठरला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com