Indian Navy has raised its image by operating with humanitarian spirit in challenging times
भारतीय नौदलाने आव्हानात्मक काळात मानवतावादी भावनेने कार्यरत राहून प्रतिमा उंचावली
भारतीय नौदलानं आपल्या देशाचं रक्षण केलं असून आव्हानात्मक काळात मानवतावादी भावनेनं कार्यरत राहून प्रतिमा उंचावली असल्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रशंसोद्गार
नवी दिल्ली : भारतीय नौदलानं आपल्या देशाच रक्षण केलं असून आव्हानात्मक काळात कार्यरत राहून मानवतावादी भावनेनं स्वतःची प्रतिमा उंचावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.
नौदल दिनानिमित्त त्यांनी नौदलाच्या सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आम्हाला आमच्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान आहे.
नौदलानं देशाचं रक्षण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली असून संघर्षाच्या काळातही आपली मानवता जपली आहे. देशाच्या समृद्ध नौदलाबद्द्ल आपल्याला गर्व वाटतो, असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनीही नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नौदलानं देशांच्या सागरी सीमांचं रक्षण करतांना दाखवलेल्या अतुलनीय शौर्य, समर्पण आणि कटिबद्धतेबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा देतांना नौदलाचं शौर्य, धैर्य आणि व्यावसायिक कौशल्याचा गौरव केला आहे. भारतीय नौदल सागरी किनारे सुरक्षित ठेऊन देशाच्या संरक्षणात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी म्हटले आहे की भारतीय नौदलाचे उद्दिष्ट मेड इन इंडिया, मेड बाय इंडिया आणि मेड फॉर इंडिया सुरक्षा उपाय आहे जेणेकरून ते आत्मनिर्भरताकडे वाटचाल मजबूत करू शकेल.
अॅडमिरल हरी कुमार म्हणाले, जोपर्यंत बजेटच्या अनुकूलतेचा संबंध आहे, भारतीय नौदल स्वावलंबी आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करत आहे आणि तिच्याकडे सर्व भांडवली प्रकल्पांसाठी पुरेसा निधी आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज नौदल दिनानिमित्त कोची येथील वॉर मेमोरियल, सदर्न नेव्हल कमांड येथे पुष्पहार अर्पण केला. सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, एमए हम्पीहोली यांनीही स्मारकाला पुष्पहार अर्पण केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com