युक्रेन सोडलेले भारतीय विद्यार्थी रशियामध्ये आपलं शिक्षण सुरु ठेवू शकतात

Indians stranded in Ukraine reached in Mumbai

Indian students who left Ukraine can continue education in Russia- Oleg Avdeev

युक्रेन सोडलेले भारतीय विद्यार्थी रशियामध्ये आपलं शिक्षण सुरु ठेवू शकतात – ओलेग एव्दिव

Indians stranded in Ukraine reached in Mumbai
File Photo

चेन्नई : फेब्रुवारी २०२२ च्या अखेरीस रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर हजारो भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते आणि अनेकांना युक्रेनमधून भारतात हलवण्यात आले होते.

रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान युद्धाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच रशियाने म्हंटल आहे की ज्या भारतीय विद्यर्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे, ते, रशियामध्ये आपलं शिक्षण सुरु ठेवू शकतात. रशिया आणि युक्रेन मधील वैद्यकीय अभ्यासक्रम समान आहे.

युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांचं रशियात स्वागतच आहे असं रशियन राजदूत ओलेग एव्दिव यांनी काल चेन्नई इथं बोलताना सांगितलं. गेल्या फेब्रुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं. अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून, युक्रेन मधून मायदेशी परतले.

दरवर्षी, असंख्य भारतीय विद्यार्थी वैद्यकशास्त्र आणि इतर विशेष अभ्यासक्रम शिकण्यासाठी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये जातात.

विशेष म्हणजे, मॉस्कोने युक्रेनचे वेगळे झालेले प्रदेश – डोनेस्तक आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र संस्था म्हणून मान्यता दिल्यानंतर तीन दिवसांनी, रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली.

यूके, अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांचा निषेध केला आहे आणि मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत. रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला लष्करी मदत करण्याचे आश्वासनही या देशांनी दिले आहे.

एव्दिव यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांच्या रशियाच्या तेल निर्यातीविषयी केलेल्या उद्गारांची प्रशंसा केली आहे. भारत सरकार एक जबाबदार सरकार असून, ते आपल्या ग्राहकांच्या हिताचाच नेहेमी विचार करेल असं जयशंकर यांनी म्हटलं होत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थी रशियात येत असल्याबद्दल एव्देव यांनी समाधान व्यक्त केलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *