भारतीय पारंपरिक औषधोपचार पद्धतींनी आजवर महत्त्वाची भूमिका बजावली

Ayush-Mantralaya Govt of India

Indian traditional medicine systems have played an important role in the field of health and medicine till date

भारतीय पारंपरिक औषधोपचार पद्धतींनी आजवर आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली

– सर्वानंद सोनोवाल

गुवाहाटी : केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी काल गुवाहाटी येथे शांघाय सहकार्य संघटने (एससीओ) अंतर्गत पारंपरिक औषधांवरील पहिल्या बी2बी जागतिक परिषदेचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले.Ayush-Mantralaya Govt of India

17 एससीओ (4 आभासी माध्यमातून) देशांमधील 150 हून अधिक प्रतिनिधी आणि हितधारक उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. याच प्रांगणात पारंपरिक औषधांवरील चार दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनही आज सोनोवाल यांच्या हस्ते झाले.

भारतीय पारंपरिक औषधोपचार पद्धतींनी आजवर आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली असून जगात सर्वत्र या पद्धतींना मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जगातल्या जैवविविधतेने सर्वात समृद्ध अशा १७ देशांमधे भारताचा समावेश होतो, त्यामुळे औषधी वनस्पतींची उपलब्धता चांगली असून त्याची उलाढाल २२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे असं सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं.

पारंपरिक औषधे लाखो लोकांसाठी, विशेषत: विकसनशील देशांमधील ग्रामीण भागांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कसा होता याबद्दल मालदीवच्या उप-आरोग्य मंत्री सफिया मोहम्मद सईद यांनी माहिती दिली. सर्वोत्तम पद्धतींच्या गरजेवर त्यांनी भर दिला कारण सध्या आपल्याकडे उद्योगाला मदत करण्यासाठी कायदेशीर चौकट आणि मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. महेन्द्रभाई मुंजपारा यांनी सांगितलं, की पारंपरिक औषधोपचार पद्धती आधुनिक वैद्यक शास्त्राशी जोडली जावी हे भारताचं उद्दिष्ट आहे.
ही परिषद येत्या ५ मार्चपर्यंत चालेल. १३ विविध देशांमधून दीडशेहून जास्त प्रतिनिधी परिषदेत सहभागी होत आहेत. आरोग्य आणि औषधोपचार क्षेत्रातल्या उद्योजक व्यावसायिकांना या परिषदेमुळे आदानप्रदानाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *