India’s first astronomical observatory in Ladakh will be operational in the next three months
लडाखमध्ये भारतातलं पाहिलं खगोल निरीक्षण केंद्र येत्या तीन महिन्यांत कार्यान्वित होणार
प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व्ह लडाखमध्ये हानले इथं उभारला जाणार असून तो चांगथांग वन्य जीव अभयारण्याचा भाग असेल. या उपक्रमामुळे भारतात खगोल पर्यटनाला चालना मिळणार असून ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गामा रे टलीस्कोपसाठीच्या जगातल्या सर्वात उंचावरच्या स्थळांपैकी तो एक असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
हा डार्क स्काय रिझर्व्ह सुरु करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषद लेह, आणि भारतीय खगोल भौतिक शास्त्र संस्था यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याचं ते म्हणाले. या ठिकाणच्या स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं विविध उपक्रम राबवले जातील असं ते म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, CLRI ची प्रादेशिक शाखा स्थापन करण्याच्या शक्यतेचा शोध घेण्यासाठी चेन्नईच्या सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या वर्षाच्या अखेरीस लडाखला भेट देईल. लडाखमध्ये चामड्याच्या संशोधनासाठी आणि उद्योगासाठी आणि प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेल्या उत्पादनांच्या जैव-अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी प्राण्यांची खूप समृद्ध आणि विस्तृत विविधता आहे. प्रसिद्ध पश्मिना शेळ्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी लेह आणि कारगिल येथे प्रत्येकी दोन अशा ४ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी सीएसआयआरचे कौतुक केले.
लडाख प्रशासनाने लेह बेरीची व्यावसायिक लागवड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR लेह बेरीला प्रोत्साहन देत आहे जे थंड वाळवंटातील एक विशेष खाद्य उत्पादन आहे आणि व्यापक उद्योजकता तसेच स्वयं-उदरनिर्वाहाचे साधन आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com