इस्रो, कडून शुक्रवारी भारताचा पहिला खाजगी अग्निबाण प्रक्षेपित होणार

ISRO Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्था हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

India’s first private fireball will be launched by ISRO on Friday

इस्रो, कडून शुक्रवारी भारताचा पहिला खाजगी अग्निबाण प्रक्षेपित होणार

नवी दिल्ली : इस्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) उद्या आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून भारताचा पहिला खाजगी अग्निबाण प्रक्षेपित करून नवा इतिहास रचणार आहे. ISRO Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्था हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

अंतराळ मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, विक्रम-सबर्बिटल (VKS) रॉकेटच्या ऐतिहासिक पहिल्या खाजगी प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्यासाठी ते श्रीहरिकोटा येथे असतील.

ते म्हणाले की, विक्रम रॉकेट प्रक्षेपण प्रवेशातील अडथळे दूर करून किफायतशीर उपग्रह प्रक्षेपण सेवेसाठी सुवर्ण संधी निर्माण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये खाजगी सहभागासाठी अंतराळ क्षेत्र उघडल्यानंतर इस्रोच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मंत्र्यांनी म्हटले.

विक्रम अग्निबाण यशस्वी प्रक्षेपणामुळे या क्षेत्रात सर्वाना समान संधी मिळेल. स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप, स्काय रूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड याच्या संयुक्त विद्यमानं विक्रमची निर्मिती झाली आहे.

जवळपास ५५० किलो वजनाचा हा अग्निबाण १०१ किलोमीटर अंतर ३०० सेकंदात कापेल आणि नंतर समुद्रात पडेल. प्रक्षेपणाचा एकूण कालावधी ३०० सेकंद आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *