Life Insurance Corporation of India’s initial share sale scheme starts today
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेची आज सुरुवात
मुंबई : एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ अर्थात प्राथमिक समभाग विक्री आजपासून अँकर गुंतवणूकदारांसाठी खुली झाली आहे.
IPO मध्ये १० कोटींपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक करणाऱ्यांना अँकर गुंतवणूकदार म्हटलं जातं.
सर्वसामान्य नागरिक, एलआयसीचे वीमाधारक आणि कर्मचारी उद्यापासून ९ मे पर्यंत या आयपीओसाठी बोली लावू शकतील.
यासाठी ९०२ रुपये ते ९४९ रुपयांचा किंमत पट्टा निर्धारित करण्यात आला असून किमान १५ समभागांसाठी बोली लावावी लागणार आहे.
या किंमत पट्ट्यात सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांना यात ४५ रुपये तर वीमाधारकांना ६० रुपये सवलत मिळणार आहे.
हा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. सरकार LIC मधील 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे आणि एकूण IPO मूल्य 21,000 कोटी रुपये आहे.
१७ मे रोजी एलआयसीच्या समभागाची देशातल्या शेअर बाजारात नोंदणी होईल.
हडपसर न्यूज ब्युरो