India’s loss in the second match of the ODI cricket series today
एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव
भारताने मालिका गमावली
ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज ढाका इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशानं भारताचा पाच धावांनी पराभव केला.
बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मेहदी हसन मिराजच्या नाबाद शतकी खेळीमुळे बांगलादेशाला निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २७१ धावांची मजल मारता आली. त्यात महम्मदुल्लाहनं ७७ धावांचं योगदान दिलं.
भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं तीन गडी बाद केले. तर, मोहम्मद सिराज आणि उमरान मल्लिक यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.
नंतर फलंदाजीसाठी उतरल्यावर विराट कोहली केवळ ५, तर शिखर धवन ८ धावांवर बाद झाला. श्रेयश अय्यरनं ८२ धावा केल्या. अक्षर पटेलनं ५६, तर रोहित शर्मानं नाबाद ५१ धावा केल्या. मात्र, ५० षटकात भारताचा संघ ९ गडी गमावून २६६ धावाच करू शकला.
बांगलादेशतर्फे इबाजत हुसेननं ३, तर मेहदी हसन मिराज आणि शाकीब हसननं प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला जबर मार लागला.
रोहित शर्माने नाबाद ५१ धावा फटकावताना बोटाच्या दुखापतीशी झुंज देत धैर्याने तोंड दिले.
शेरे बांगला स्टेडियमवर, भारताच्या कर्णधाराने, बोटाच्या दुखापतीला तोंड देत, पॉवर हिटिंगचा अप्रतिम प्रदर्शन केले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
भारतीय कर्णधाराच्या २८ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी पाहुण्यांचे २७२ धावांचे आव्हान पेलू शकले नाही आणि बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालिका पराभव रोखण्यासाठी पुरेशी ठरली नाही. त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण भारत एकूण धावसंख्येपेक्षा ५ धावांनी कमी पडला आणि २-० ने मालिका गमावली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com