By 2024, India’s roads will be like America’s – Nitin Gadkari
२०२४ पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील – नितीन गडकरी
नवी दिल्ली: २०२४ पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. रस्ते, परिवहन आणि महामार्गांच्या अनुदानावरील चर्चेला ते उत्तर देत होते.
भविष्यात हायड्रोजनवर आधारित वाहन निर्मितीला चालना दिली जाईल. इलेक्ट्रीक वाहनांमुळे खर्चात मोठी बचत होईल, असंही ते म्हणाले. देशात दरदिवशी ३८ किलोमीटरच्या रस्त्यांची बांधणी केली जात आहे. सुंदर रस्त्यांमुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. अटल आणि जोजिला या बोगद्यांमुळे लदाखचं अंतर कमी झालं आहे. सरकार रस्ते निर्मिती करताना पर्यावरणाचाही समतोल साधत आहे.
रस्त्यांवरील दुर्घटना कमी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. हरित महामार्गांमुळे वाहनांची वाहतूक ठप्प होणार नाही, असंही ते म्हणाले.
Hadpsar News Bureau