Infrastructure development works are leading to employment generation and investment
पायाभूत सुविधा विकास कामांमुळे रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक होत आहे
– प्रधानमंत्री
कर्नाटकात मांड्या इथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी
मांड्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकातल्या मांड्या इथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण आणि म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गासाठीच्या पायाभरणीचा समावेश आहे.
यावेळी पंतप्रधानांनी सुरुवातीला भुवनेश्वरी देवी आणि आदिचुंचनगिरी आणि मेलुकोटच्या गुरुंना वंदन केले. कर्नाटकाच्या विविध भागातल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तसेच लोकांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेषतः मांड्याच्या लोकांनी त्यांचे ज्याप्रकारे प्रेमपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्यावर आशीर्वादाची बरसात केली, त्याबद्दल आभार व्यक्त केले.
कर्नाटकातील लोकांकडून मिळणाऱ्या स्नेहाचा विशेष उल्लेख करत, पंतप्रधान म्हणाले की हे दुहेरी इंजिनचे सरकार, जलद गतीने विकासाचे प्रकल्प पुढे नेत समाजातील प्रत्येक नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम करत आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात हाती घेतलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांमुळे केवळ प्रवास सुखकर होण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि गुंतवणूकही होत आहे, शिवाय स्थानिक जनतेसाठी उत्पन्नाचे विविध मार्गही शोधता आले, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज कर्नाटकात मांड्या इथं बंगळुरु मैसूर या दहापदरी द्रुतगती मार्गाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी अर्ध्यापेक्षा कमी होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा विकासाकरता १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या विकास मोहिमेच्या अग्रस्थानी गरीब आहेत. म्हणूनच निवारा, नळाद्वारे पाणी, उज्वला गॅस जोडणी, वीज आणि रस्ते जोडणी यांना सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. सहकार क्षेत्रासाठी, तसंच ऊसक्षेत्राच्या कर सवलतीसाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असं मोदी यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, प्रह्लाद जोशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com