संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी

विधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Demand to file infringement of rights against Sanjay Raut

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळविधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ केला. गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळात सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत आहेत.

विधानसभेत अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दिली होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला होता.

विधिमंडळाबाबत कोणीही असे उद्गार काढणं गैर आहे मात्र कारवाईपूर्वी राऊत यांचं म्हणणं तपासून पाहण्याची गरज आहे अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मांडली.

याप्रकरणी येत्या दोन दिवसात चौकशी करुन येत्या ८ मार्चला पुढचा निर्णय जाहीर करू अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष आजच 15 सदस्यांची समिती स्थापन करणार आहेत.

राऊत यांचे वक्तव्य अतिशय अपमानास्पद असून हा विधिमंडळ सदस्यांसह, संविधान आणि संपूर्ण राज्यातल्या नागरीकांचा अपमान आहे, असं नार्वेकर म्हणाले. विधानसभा सदस्यांच्या विशेषाधिकारांचं संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

अध्यक्षांच्या या घोषणेनंतरही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात येऊन गोंधळ घातला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानपरिषदेतही या मुद्यावरून गोंधळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज स्थगित झालं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *